शंभराच्या बनावट नोटा बनविणारे जेरबंद; दरोडा प्रतिबंधक विभागाची पुण्यात कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:34 PM2018-01-06T18:34:09+5:302018-01-06T18:41:48+5:30

शंभराच्या बनावट छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

fake currency of 100 rupees note; two arrested by police in Pune | शंभराच्या बनावट नोटा बनविणारे जेरबंद; दरोडा प्रतिबंधक विभागाची पुण्यात कारवाई 

शंभराच्या बनावट नोटा बनविणारे जेरबंद; दरोडा प्रतिबंधक विभागाची पुण्यात कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्देघरातच कलर प्रिंटरच्या सहायाने झेरॉक्सच्या जाड कागदावर नोटांची छपाईन्यायालयाने आरोपींना १० जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

पुणे : शंभराच्या बनावट छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. घरातच कलर प्रिंटरच्या सहायाने झेरॉक्सच्या जाड कागदावर नोटांची छपाई करण्यात आली.  
संदीप वसंत नाफाडे (वय ३४, रा. साठे वस्ती, लोहगाव), उदय प्रताप वर्धन (वय ३४, रा. कलवड वस्ती लोहगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरोडा प्रतिबंधक विभागातील पोलीस हवालदार अजय थोरात यांना खबऱ्यामार्फत या प्रकाराची माहिती मिळाली होती. एक व्यक्ती टिंगरेनगर येखील शेवटच्या बसस्टॉपजवळ भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाची व्यक्ती डीसीबी बँकेच्या एटीएमबाहेर उभी असल्याचे दिसून आले. 
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संदीप नाफाडे असे नाव सांगितले. त्याच्या झडतीत पँटच्या खिशात १०० रुपयांच्या ५० हजार रुपये मूल्याच्या ५०० नोटा आढळून आल्या. वर्धन याने बनावट नोटा दिल्याचे नाफाडे याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार वर्धन याच्या घराची झडती घेतली असता, तेथे १०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा मिळाल्या. तसेच ३५ हजार रुपयांचा लॅपटॉप, १२ हजार रुपयांचा प्रिंटर, ए फोर आकाराचे २०० कागद येथून जप्त करण्यात आले. आरोपी शंभराची नोट स्कॅन करुन त्याची प्रिंट काढत होते. त्यांनी नक्की किती नोटा चलनात आणल्या याबाबत तपास सुरु आहे. न्यायालयाने त्यांना १० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अमलदार प्रताप कोलते यांनी दिली.    
दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युलता चव्हाण, लक्ष्मण डेंगळे, संजय दळवी, विनायक पवार, रामदास गोणते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: fake currency of 100 rupees note; two arrested by police in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे