बनावट आयडीतून ई-तिकीट घोटाळा, ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:18 AM2018-11-13T02:18:16+5:302018-11-13T02:18:22+5:30

आरपीएफकडून दोन जणांना अटक : ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

Fake ID seized e-ticket scam, tickets worth Rs. 62 thousand rupees | बनावट आयडीतून ई-तिकीट घोटाळा, ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

बनावट आयडीतून ई-तिकीट घोटाळा, ६२ हजार रुपयांची तिकिटे जप्त

Next

पुणे : बनावट ई-मेल आयडीच्या आधारे रेल्वेच्या संगणक प्रणाली (ई-तिकिट) द्वारे रेल्वेच्या विविध ठिकाणी धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षित तिकीट काढून घोटाळा करणाºया सांगली येथील दोघांना रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने अटक केली आहे.

मनजित बाबासाहेब पाटील (वय ३७, रा. सांगली), गजानन काडप्पा गोंधळी (वय २९, रा. सांगली) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहते. हे दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाड्यांचे ई-तिकीट काढत होते. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दोघेही संबंधित कॅफेमध्ये आले व तिकिटांचे प्रिंट घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पुढील तारखेची दहा तिकिटे व मागील ५० असे एकूण ६२ हजार रुपयांची ६० तिकिटे जप्त केले आहेत. तसेच दोन संगणक, दोन मॉनिटर, दोन मोबाइल त्यांच्या ताब्यातून हस्तगत केले आहे. बनावट आयडीद्वारे ते काही सेकंदाच्या आत रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यावर काढत असल्याचे दिसून आले आहे. रजिस्टर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून आरोपींनी कशाप्रकारे बनावट आयडीद्वारे तिकिटे काढली व त्यांचे आणखी अन्य साथीदार आहेत का याबाबत तपास सुरू आहे.

आणखी बनावट ई-मेल आयडी सापडण्याची शक्यता
आरोपींकडे अजून काही बनावट ई-मेल आयडी मिळून येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यादृष्टीने तपास आरोपींकडे करावयाचा आहे. सोमवारी त्यांना रेल्वेच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
त्यावेळी सरकारी वकील वामन कोळी यांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Fake ID seized e-ticket scam, tickets worth Rs. 62 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.