कर्ज फेडल्याचे बनावट प्रमाणपत्र, १० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:16+5:302020-11-26T04:27:16+5:30
पुणे : खासगी वित्तीय कंपनीकडून मोटार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बनावट ना हरकम प्रमाणपत्र सादर करुन १० ...
पुणे : खासगी वित्तीय कंपनीकडून मोटार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बनावट ना हरकम प्रमाणपत्र सादर करुन १० लाख ६१ हजार ७५२ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
अविनाश हिरामण गायकवाड (रा़ सांगरुण ता़ हवेली) आणि योगेश सुनिल कराळे (रा़ नºहे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीचे विभगीय व्यवस्थापक सुमीत कांबळे यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
गायकवाड यांनी कंपनीकडून मोटार खरेदीसाठी ४ लाख ९१ हजार ९३५ रुपयांचे कर्ज घेतले होते़ कराळे यांनी ५ लाख ६९ हजार ८१७ रुपयांचे कर्ज घेतले होते़ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोघांनी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याबाबतची बनावट कागदपत्रे सादर केली़ कंपनीचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र, अधिकाऱ्यांची बनावट सही करुन ती कागदपत्रे आरटीओमध्ये १७ ते २६ मार्च २०१९ मध्ये सादर करुन कंपनीची फसवणूक केली़ पोलीस निरीक्षक शफील पठाण अधिक तपास करीत आहेत़