Pune: लोणावळ्यात तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:34 AM2023-06-21T10:34:25+5:302023-06-21T10:36:29+5:30

नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची मागणी...

Fake naval officer busted in Lonavala, arrested along with two accomplices | Pune: लोणावळ्यात तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह घेतले ताब्यात

Pune: लोणावळ्यात तोतया नौदल अधिकाऱ्याचा पर्दाफाश, दोन साथीदारांसह घेतले ताब्यात

googlenewsNext

लोणावळा : नौदलात कमांडंट पदावर नोकरीस असल्याची बतावणी करून लोणावळा परिसरातील मुलांना आय. एन. एस. शिवाजी लोणावळा येथे नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्यास आलेल्या तोतया नौदल अधिकाऱ्याला त्याच्या दोन साथीदारांसह सापळा लावून अटक केली.

ॲड. ऐश्वर्या कृष्णा लेंडघर (रा. भांगरवाडी लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लेंडघर यांचा नोटरीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे सप्टेंबर २०२२ मध्ये नौदलाच्या गणवेशात आलेल्या तोतया नौदल अधिकारी आकाश काशिनाथ डांगे (वय २८, रा. भाडाळी, जि. सातारा) याने फिर्यादी यांच्याकडून १५ जणांचे प्रतिज्ञापत्र बनवून घेतले. त्यानंतर ते वारंवार फिर्यादी यांचे कार्यालयात येऊन त्यांची ओळख वाढवून त्यांना लोणावळा परिसरातील तसेच त्यांचे नातेवाइकांना नौदलात नोकरी लावण्याची गळ घालून एकूण १९ जणांना नौदलात विविध पदांवर नोकरीस लावण्याच्या बदल्यात प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्याचे ठरवून बोलणी केली होती.

त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या आय. एन. एस. शिवाजी लोणावळा येथील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची भरती केली जात नसल्याचे समजल्याने फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधून आणखी एका मुलाला नोकरीस लावण्यासंदर्भात विचारणा केली असता तो त्यासाठी लगेचच तयार झाल्याने फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधून आरोपी पैसे स्वीकारून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यासाठी येणार असल्याचे कळविल्याने लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, लोणावळा शहर पोलिस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन तसेच आयएनएस शिवाजी लोणावळा नेव्हल पोलिस टीम यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून ठिकाणी छापा टाकून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक (एमएच ४२ एआर २००५) ही ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता त्यामध्ये नौदलाचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस, पांढरा शूज, बेल्ट, नेमप्लेट असे एकूण १५ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.

Web Title: Fake naval officer busted in Lonavala, arrested along with two accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.