डॉक्टर तरुणीचे केले बनावट प्रोफाइल; अश्लिल पोस्ट बघून अनेकांकडून फोनद्वारे शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:03 PM2021-11-03T14:03:03+5:302021-11-03T14:03:11+5:30

आरोपीने एका वेबसाईटवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली

Fake profile of doctor girl demands for body comfort by phone after seeing pornographic posts | डॉक्टर तरुणीचे केले बनावट प्रोफाइल; अश्लिल पोस्ट बघून अनेकांकडून फोनद्वारे शरीरसुखाची मागणी

डॉक्टर तरुणीचे केले बनावट प्रोफाइल; अश्लिल पोस्ट बघून अनेकांकडून फोनद्वारे शरीरसुखाची मागणी

googlenewsNext

पुणे : मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे या तरुणींना अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षाच्या डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधांशु प्रदीपकुमार पारीख (वय ३७, रा. आदित्य रेसिडेन्सी, पिंपळे निलख) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी भारत मेट्रोमनी या वेबसाईटवर लग्नाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरुन त्यांची आरोपीशी ओळख झाली. २०१६ ते २०१९ दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात व्यवस्थित बोलणे चालू होते. फिर्यादीबरोबर बोलणी सुरु असताना आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. तेव्हा आरोपी व त्याच्या आईवडिलांनी फिर्यादी यांचे क्लिनिकवर येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करुन फिर्यादीची बदनामी केली.

आरोपीने एका वेबसाईटवर फिर्यादीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली. त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे त्यांना अचानक अनेक अनोळखी लोकांनी फोन येऊ लागले. त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक चाटे तपास करीत आहेत.

Web Title: Fake profile of doctor girl demands for body comfort by phone after seeing pornographic posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.