बनावट शिक्के बनवून फसवणाऱ्याला अटक

By admin | Published: January 24, 2017 01:25 AM2017-01-24T01:25:28+5:302017-01-24T01:25:28+5:30

नानगाव येथील बँक आॅफ महाराष्ट्राचा ग्राहक सेवेचा केंद्रचालक नंदकिशोर शेलार (वय २३, रा. नानगाव) यास बनावट शिक्के बनवून

Fake sticks make the deceiver arrested | बनावट शिक्के बनवून फसवणाऱ्याला अटक

बनावट शिक्के बनवून फसवणाऱ्याला अटक

Next

केडगाव : नानगाव येथील बँक आॅफ महाराष्ट्राचा ग्राहक सेवेचा केंद्रचालक नंदकिशोर शेलार (वय २३, रा. नानगाव) यास बनावट शिक्के बनवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी अटक केली आहे.
बँकेचे खातेदार अंकुश जाधव यांनी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रने वक्रांगी फिनसर्वे कंपनीला ग्राहक सेवा केंद्र नेमण्याचा ठेका दिला होता. बँकेच्या केडगाव शाखेअतंर्गत नानगाव येथे शेलार ग्राहक सेवा केंद्र चालवत होता.
यामध्ये अधिकार नसतानाही बनावट शिक्के बनवून शेलार याने पैसे भरल्याच्या बनावट पावत्या बनवून संबंधित पैसे बँकेत न भरता स्वत: वापरल्याचे म्हटले आहे.
अंकुश जाधव यांनी वडिलांच्या खात्यावर २ लाख रुपये भरल्याच्या स्लिपा जाधव यांच्याकडे आहेत. परंतु प्रत्यक्षात पासबुकात याची नोंद नाही. याबाबत माहिती घेतली असता केंद्रचालक शेलार याने टाळाटाळ केली. त्यानंतर शेलार याच्यावर गुन्हा दाखल होऊन ३ दिवसांची पोलीस कोठडी दौंड न्यायालयाने सुनावली आहे.
त्यानुसार टिळेकर यांच्या पेन्शनची १५ हजार रुपयांची रक्कम शेलार यांनी नानगाव येथील केंद्रात न ठेवता पाटस येथील एका खासगी कंपनीत गुंतवले आहेत. टिळेकर यांना नातवाच्या उपचारासाठी पैशाची गरज असून हेच पैसे संबंधित खासगी कंपनीत गुंतवल्याचे प्रमाणपत्र
शेलार यांनी टिळेकर यांना दिले आहे. यावरून आपली फसवणूक
झाल्याचे लक्षात येताच टिळेकर यांनी शेलार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fake sticks make the deceiver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.