खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट टोल पावत्याचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:43+5:302021-02-26T04:12:43+5:30

अभिजित बाबर हे सातारा रस्त्यावर प्रवास करत असताना त्यानी आणेवाडी टोल नाक्यावर व खेड-शिवापूर टोल ...

Fake toll receipt racket at Khed-Shivapur toll plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट टोल पावत्याचे रॅकेट

खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट टोल पावत्याचे रॅकेट

Next

अभिजित बाबर हे सातारा रस्त्यावर प्रवास करत असताना त्यानी आणेवाडी टोल नाक्यावर व खेड-शिवापूर टोल नाक्यावर रितसर टोल फाडला. मात्र, बारकाईने पाहिले असता आणेवाडी टोल नाका व खेड-शिवापूर टोल नाका या मधील टोलपावत्यांमध्ये त्यांना फरक दिसून आला. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस विभागाकडे केली. स्थानिक गुन्हे शाखेने बाबर यांच्यासह संबंधित टोलनाक्यांवर ती जाऊन पावती संदर्भात खातरजमा केली. या पावत्या बनावट असल्याचे उघड झाले. यासंदर्भात अभिजित बाबर यांनी राजगड पोलिसांत तक्रार दाखल केली.

राजगड पोलिसांनी सुदेश प्रकाश गंगावणे वय 25, रा. वाई धोम कॉलनी), अक्षय तानाजी सणस (वय 22, रा. वाई नागेवाडी), शुभम सीताराम डोलारे (वय 19, रा. जनता वसाहत, पुणे), साई लादूराम सुतार (वय 25, रा. दत्तनगर, कात्रज), हेमंत भाटे , दादा दळवी, सतीश मरगजे व त्यांचे इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात, रिलायन्स इन्फ्राचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्याकडे माहितीसाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही, या प्रकरणाचा पुढील तपास राजगडचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मुगदूम हे करत आहेत.

चौकट

टोल नाक्यावरील तोतयागिरी या रूपाने उघड झाली आहे, वर्षानुवर्षे अशाच प्रकारे सर्वसामान्यांची व शासनाची लुबाडणूक या टोलच्या माध्यमातून होत असून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा झोल या टोल नाक्यावर झालेला आहे याची सखोल चौकशी व्हावी व हा टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी आम्ही करतो.

-दिलीप बाठे

(समन्वयक, शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती)

Web Title: Fake toll receipt racket at Khed-Shivapur toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.