थंडीत शेकणाऱ्या वेटरचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 12:39 AM2019-01-06T00:39:37+5:302019-01-06T00:40:38+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकलहरे गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गालगत रमेश सदाशिव कानडे यांच्या मालकीचे हॉटेल श्रीराम आहे

Falling in a cold wetter's death | थंडीत शेकणाऱ्या वेटरचा गुदमरून मृत्यू

थंडीत शेकणाऱ्या वेटरचा गुदमरून मृत्यू

Next

मंचर : थंडीमुळे खोलीत घमेल्यात शेकोटी केल्यानंतर त्याच्या धुराने गुदमरून एक जण मरण पावला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना एकलहरे गावच्या हद्दीतील हॉटेल श्रीराममध्ये रात्री घडली.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकलहरे गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गालगत रमेश सदाशिव कानडे यांच्या मालकीचे हॉटेल श्रीराम आहे. गुरुवारी सायंकाळी हॉटेलवर एक अनोळखी इसम आला. मला गावी जायचे आहे, मला दोन दिवस काम द्या व मला गावी जाण्यासाठी तिकिटापुरते पैसे द्या, असे त्या इसमाने कानडे यांना सांगितले. सदर इसमाला कानडे यांनी वेटर म्हणून कामास ठेवले. शुक्रवारी दिवसभर त्याने काम केले. हॉटेलमालक रमेश कानडे हे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हॉटेल बंद करुन घरी गेले. तो अनोळखी वेटर व दुसरा वेटर नवनाथ कातडे (वय २५, रा. भंडारदरा) हे हॉटेलमागे असलेल्या एका खोलीत झोपण्यासाठी गेले. थंडीचा कडाका असल्याने त्यांनी घमेल्यात शेकोटी केली. ती शेकोटी खोलीत ठेवून दोघे झोपी गेले. शेकोटीच्या धुरामुळे दोघे वेटर गुदमरले. दोघेही बेशुद्ध पडले. शनिवारी सकाळी हॉटेलमालक रमेश कानडे हॉटेलवर आले असता त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. बराच वेळानंतर वेटर नवनाथ नामदेव कातडे याने दरवाजा उघडला व तो लगेच बेशुद्ध पडला. दोन दिवसांपूर्वी वेटर म्हणून कामाला आलेला ४७ ते ५० वर्षे वयाचा दुसरा वेटर बेशुद्ध अवस्थेत दिसला. तो मरण पावला होता. दुसरा जखमी वेटर नवनाथ नामदेव कातडे याला उपचारासाठी मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान खोलीत शेकोटी केल्यानंतर झालेल्या धुराने गुदमरून एका वेटरचा मृत्यू, तर दुसरा जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मात मयत दाखल केले आहे. मयत वेटरची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक टी. एस. मोरे करत आहेत.

Web Title: Falling in a cold wetter's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे