सीताफळाच्या भावात घसरण
By admin | Published: October 17, 2014 11:15 PM2014-10-17T23:15:12+5:302014-10-17T23:15:12+5:30
पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते.
Next
नारायणपूर : पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शेतक:यांनी दोन-चार दिवस सीताफळाची तोडणीच केली नसल्याने मागील काळात चांगला बाजारभाव मिळाला. मात्न निवडणूक संपताच बाजारात सीताफळांची मोठी आवक झाल्याने बाजारभाव काहीसे कोसळले.
साधारण चांगल्या प्रतीचा माल एक क्यारेट आज 1 हजार
रुपांपर्यंत बाजार मिळाला. त्याखालोखाल 2 नंबरच्या मालाला साधारण सरासरी एक क्यारेट 4क्क् ते 6क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला. तर 3 नंबरचा माल बारीक माल तो सरासरी 15क् ते 3क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला.
आज बाजारत बारामतीच्या सीताफळांची मोठी आवक
झाली. अचानक तीन पिक अप
माल आला आणि व्यापारीही
आज कमी प्रमाणात बाजारात फिरताना दिसल्याने बाजारात
शेतकरी सरासरी पाहून आपल्या मालाची विक्री करीत होते.
एक क्यारेट साधारण 15 ते 16 किलो पर्यंत वजन भरते. तर बारीक मालाचे वजन हे साधारण 17 ते 18 किलो पर्यंत भरते.
सासवड बाजारपेठेत तालुक्यातील काही व्यापारी हे चांगल्या प्रतीचा माल हा दिल्ली बाजारपेठेत नेत असतात. तर काही मुंबई याठिकाणी नेत असतात.
महाड येथूनही मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. तर पुरंदर तालुक्यात काळेवाडी, पांगारे आदी ठिकाणी सिताफळ प्रक्रियेसाठी नेला जातो. याठिकाणी बारीक मालाला मोठी मागणी असते. व्यापारी माल खरेदी केल्यावर प्रतवारी करून माल पुढे पाठवीत असतात. (वार्ताहर)
4पुरंदर तालुक्यातून पिंपळे, सोनोरी, सुपे खुर्द, काळेवाडी, गुरोळी, वाघापूर, सिंगापूर, ङोंडेवाडी, दिवे, शिवरी, कुंभारवळण, पिसर्वे, वीर, पांगारे, हिवरे, चांबळी, पारगाव, जाधववाडी, वनपुरी आदी भागातून मोठय़ा प्रमाणात सीताफळांची आवक होत असते. सासवड बाजारपेठ जवळ असल्याने शेतकरी या ठिकाणीच आपला माल विक्रीसाठी आणतात. दोन रुपये कमी पण रोख पैसे मिळतात. खर्च कमी होत असल्याने शेतक:यांना जास्तीत जास्त प्रमाणात परवडते.