धर्मांध विचार राष्ट्रीय एकात्मतेस घातक : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:00 AM2018-02-23T01:00:47+5:302018-02-23T01:00:57+5:30

अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे

False idea is dangerous to national integration: Shripal Sabnis | धर्मांध विचार राष्ट्रीय एकात्मतेस घातक : श्रीपाल सबनीस

धर्मांध विचार राष्ट्रीय एकात्मतेस घातक : श्रीपाल सबनीस

Next

पिंपरी : अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे. त्यामुळे एकात्म भारतीय समाजाच्या अक्षरश: चिंधड्या होत आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संवैधानिक मूल्ये समाजाच्या अंतरंगात खोलवर रुजविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने बंधुताचे कार्य खरोखरच महान आहे, असे मत ८९अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि सुरून इंफोकोअर सिस्टिम या संस्थांच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सबनीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या वेळी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर, विवेक इनामदार, मधुश्री ओव्हाळ, महेंद्र भारती, सुनील यादव, सर्वेश सोनवणे उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘महापुरुषांना जातीच्या कप्प्यात बंदीस्त करून पुरोगामी विचारांची लढाई लढणे उचित नव्हे. हा सपशेल खोटारडेपणा आहे. त्यांच्या प्रगतिशील विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे.’’
प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. सर्वेश सोनवणे आणि सुनील यादव यांनी संयोजन केले.

Web Title: False idea is dangerous to national integration: Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.