पालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:58 AM2018-12-21T01:58:38+5:302018-12-21T01:58:56+5:30

अपात्र उमेदवारांना घुसवले : परीक्षा घेऊनही निकाल जाहीर नाही

False suspicion about the development of the corporation | पालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय

पालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय

Next

पुणे : महापालिकेच्या कारकून भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय पीएमसी एम्प्लॉईज युनियनने व्यक्त केला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांमध्ये सुशिक्षित असलेल्या कर्मचाºयांची संख्या बरीच मोठी आहे. वारसा हक्काने नोकरी मिळत असल्याने शिक्षण असूनही नोकरीची संधी मिळाली की ते लगेच नोकरी स्वीकारतात. त्यानंतर मग वरच्या वर्गात येण्यासाठी प्रयत्न करतात. खात्यांतर्गत परीक्षा घेऊन अशा उमेदवारांना तृतीय श्रेणीत टंकलेखक किंवा कारकून म्हणून सामावून घेतले जाते. त्यासाठी त्यांची सेवेची ५ वर्षे पूर्ण झाली असल्याचे बंधन घालण्यात येते. त्याशिवाय किमान १० वी उत्तीर्ण वगैरे अटीही असतात.
अशा २६७ पात्र उमेदवारांची यादी सामान्य प्रशासन विभागाने जून २०१८ मध्ये जाहीर केली. त्यांची २२ जुलै २०१८ रोजी परीक्षा घेतली. परीक्षेस बसता न आलेल्या, कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे अपात्र ठरलेल्या अशा ११७ जणांची एक यादी १२ डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे आणून देण्यास सांगण्यात आले. या यादीत बरीच नावे प्रशासनाने दिलेल्या ५ वर्षे सेवेच्या मुदतीत बसणारी नाहीत.
सेवाकाल पूर्ण करत नसलेल्या, अपात्र असलेल्या उमेदवारांना यादीत बसवण्यासाठी म्हणून हा सर्व उपद्व्याप करण्यात आला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. काही नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकाºयांनीच हा खटाटोप केला असल्याची चर्चा आहे. केवळ ५ वर्षांचा सेवाकाल पूर्ण होत नसल्याने ते अपात्र समजले गेले आहेत; मात्र ज्यांचा वशिला आहे ते असा सेवाकाल पूर्ण झाला नसतानाही पात्र समजून तृतीय श्रेणीत जाणार आहेत. युनियनचे अध्यक्ष बापू पवार व सरचिटणीस चंद्रकांत शितोळे यांनी याबाबत आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठवले आहे. पात्र उमेदवारांवर होत असलेला अन्याय त्वरित दूर करण्याची मागणी केली आहे.

प्रशिक्षण सत्र पूर्ण
४या यादीवर काही जणांनी आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने १३ डिसेंबरला एक शुद्धिपत्रक काढले. त्यानंतर ते शुद्धिपत्रक १४ डिसेंबरला लागलीच रद्द केले.
४१५ डिसेंबरला एक परिपत्रक काढले. त्यात ४३ जणांची यादी प्रसिद्ध केली. यातच पुन्हा ५ वर्षांचा सेवाकाल पूर्ण झाला नसलेली नावे घुसडण्यात आली.
४त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान हे १३ तासांचे प्रशिक्षण सत्र पूर्णही झाले.

Web Title: False suspicion about the development of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे