हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी पुणे विभागात घेणार मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 01:15 AM2019-03-09T01:15:14+5:302019-03-09T01:15:21+5:30

भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे.

For the families of martyrs, the fair will be organized in Pune division | हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी पुणे विभागात घेणार मेळावे

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी पुणे विभागात घेणार मेळावे

Next

पुणे : भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अनेक हात सरसावतात, असे असतानाही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषदेने हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे ठरवत आयोजित केलेला मेळावा कौतुकास्पद आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात हुतात्म्यांची अनेक कुटुंबीये असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना केवळ पैशाच्या स्वरूपात मदत न करता त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडणींची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना या कुुटुंबीयांना दत्तक घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पहिल्या टप्यात ११५ कुटुंबीयांची निवड करण्यात आली असून महिला दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा परिषदेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसेकर बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (निवृत्त) जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी योजना खूप असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन झाले नाही तर त्याचा फायदा त्यांना घेता येत नाही. शासनाकडून मिळणारी मदत फक्त लवकर देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. जमिनीच्या मुलांच्या शाळेच्या अडचणी, आरोग्य, कागदपत्रे आदी समस्या आहेत. या सर्वांची सोडवणूक या अधिकारी मंडळींकडून केली जाणार आहे. सूरज मांढरे म्हणाले, या कुटुंबीयांच्या निरंतर पाठीशी कुणी तरी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी मदतीचा प्रयत्न केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. धोरणात्मक बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांची जबाबदारी प्रत्येक अधिकाºयांना विभागून दिली आहे. त्यांना येणाºया समस्या संबंधित अधिकाºयांच्या मार्फत सोडवल्या जातील.
>कुटुंबीयांनी मांडल्या समस्या
१९६५, १९७१, कारगिल युद्ध तसेच शांतता काळात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे कुुटुंबीय या मेळाव्यात सहभागी झाले होते. अनेकांना शेतीसाठी जमिनी मिळाल्या नाहीत, नोकरीसाठी अर्ज करूनही नोकरी मिळाल्या नाहीत, पेट्रोल पंपासाठी अर्ज करूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही यांसारख्या समस्या अधिकाºयांपुढे मांडल्या. या वेळी उपस्थित अधिकाºयांनी त्यांच्या समस्यांचे निराकरून करून यापुढे त्यांना येणाºया प्रत्येक अडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले. माझे वडील १९६५च्या युद्धात शहीद झाले. त्यांना सेवा मेडल होते. त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय नोकरी, जमीन तसेच पेट्रोल पंप मिळावा यासाठी शासनाशी अनेक पत्रव्यवहार केले. राष्ट्रपतींनाही आम्ही पत्र लिहिले. मात्र, अद्यापही आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही. शैक्षणिक पात्रता असतानाही मला नोकरी मिळाली नाही. यामुळे अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला. जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे तसेच शासनातर्फे आयोजित अनेक मेळाव्यात सहभाग घेतला. मात्र, समस्या कायम राहिल्या. या मेळाव्यातून काही मार्ग मिळेल, अशी आशा आहे. - नवनाथ रामदास गोगावले, वीरपुत्र जिल्हा परिषदेच्या अनेक योजना शहीद कुुटुंबीयांसाठी आहेत. आम्ही त्याची यादी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. जिल्हा परिषद अधिकाºयांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड जिल्हा परिषदेला या कामी मदत करणार आहे. मिलिंद तुंगार, मेजर, जिल्हा सैनिक अधिकारी

Web Title: For the families of martyrs, the fair will be organized in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.