कौटुंबिक न्यायालय आज सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:39+5:302021-07-10T04:09:39+5:30
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शनिवारी (दि. १०) सुरू राहणार ...
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शनिवारी (दि. १०) सुरू राहणार आहे. न्यायालयीन कामकाज सकाळी ११ ते दुपारी दीड तर कार्यालयीन कामकाज दुपारी दोनपर्यंत पार पाडता येणार आहे, अशी माहिती कौटुंबिक न्यायालय पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज एका सत्रात सुरू आहे. उद्या (दि.१०) शिवाजीनगरचे जिल्हा न्यायालय बंद राहाणार असले तरी कौटुंबिक न्यायालय सुरू राहणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज बंद राहील. तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी काम भरून काढण्याकरिता न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या अधिक असल्याने आता दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार आहे. याची पक्षकार आणि वकिलांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदणे यांनी केले आहे.
--------------------------------------------------