पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 03:40 PM2020-04-08T15:40:12+5:302020-04-08T15:51:08+5:30

जामिनावर सुटका व्हावी यासाठी न्यायालयात गर्दी करणाऱ्या आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांमुळे सोशल डिस्टन्सिंंगचा भंग

The family members of the parties are doing the crowd in pune district court area | पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन

पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन

Next
ठळक मुद्दे केवळ महत्वाच्या दाव्यावर होतेय सुनावणी  अनेक पक्षकार पोलिसांशी वाद घालत असल्याची तक्रार

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा न्यायालयातील कामकाजात बदल करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारे कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी न्यायालय प्रशासनने घेतली आहे. मर्यादित न्यायाधीश, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांच्यासह केवळ अतिमहत्त्वाच्या दाव्यांची दखल घेतली जात आहे. मात्र दुसरीकडे आरोपीचे कुटुंबातील सदस्य कोर्टाच्या आवारात गर्दी करून सोशल डिस्टन्सिंंग उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. 
कोरोनापासून दुर राहण्यासाठी एकीकडे आरोग्य विभाग, प्रशासकीय विभाग सातत्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे दररोज हजारो पक्षकारांची ये-जा असणाऱ्या जिल्हा न्यायालयातील गर्दी मात्र अद्याप कमी झालेली नाही. यामुळे पुणे न्यायालय प्रशासन आणि पुणे बार असोसिएशन यांच्यावतीने पक्षकारांना केवळ महत्वाच्या कामाकरिता न्यायालयात हजर राहावे असे सांगितले आहे.  मागील दोन दिवसांपासून न्यायालयातील वाढत्या गदीर्मुळे पक्षकारांनी शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याच न्यायालयात यावे. असे सांगण्यात येत आहे.  
 जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून महत्वाचे काम असल्यासच न्यायालयात यावे असे सांगण्यात आले आहे. मात्र याकडे पक्षकारांचे कुटुंबीय दुर्लक्ष करताना दिसून आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गर्दी करु नका. महत्वाचे काम असेल तरच या असे सांगून देखील अनेक पक्षकार पोलिसांशी वाद घालत असल्याची तक्रार काही वकिलांनी केली आहे. सर्व शहर सुरक्षेच्या कारणास्तव बंद असताना नागरिकांची अरेरावी चुकीची आहे. अशी तक्रार पोलिसच नागरिकांबद्द्ल करत होते.  

* स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
न्यायालयात आरोपी आणि त्यांच्या सोबत असणारी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांची संख्या मोठी आहे. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सुरक्षितता बाळण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे अनेकांकडून अद्याप कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. सध्या न्यायालयात केवळ महत्वाच्या खटल्याचे कामकाज सुरू आहे. इतर कुठल्याही स्वरूपाचे खटले दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषत: यात पोस्कोचा उल्लेख करावा लागेल. जामिनावर सुटका व्हावी यासाठी न्यायालयात गर्दी करणाऱ्या  आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांमुळे सोशल डिस्टन्सिंंगचा भंग होत आहे. त्याचे पालन करणे आणि आपल्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. 
अ‍ॅड. लीना पाठक (जिल्हा सरकारी वकील)कुटुंबीयच 

Web Title: The family members of the parties are doing the crowd in pune district court area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.