पोलिसांच्या कुटुंबीयांना पछाडलं डासांनी
By admin | Published: October 11, 2016 01:24 AM2016-10-11T01:24:00+5:302016-10-11T01:24:00+5:30
वाढलेले गवत, तुंबलेले ड्रेनेज, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, घाणीचे साम्राज्य, डासांचा उपद्रव हे चित्र शहरातील कोणत्याही झोपडपट्टीतील
पिंपरी : वाढलेले गवत, तुंबलेले ड्रेनेज, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, घाणीचे साम्राज्य, डासांचा उपद्रव हे चित्र शहरातील कोणत्याही झोपडपट्टीतील नाही़ तर दिवसरात्र नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या पिंपरी पोलिसांच्या वसाहतीतील आहे़ गेल्या काही दिवसांपासून पिंपरी पोलीस लाइनमधील रहिवाशी अस्वच्छ वातावरणामुळे आणि असुविधांच्या बोजवाऱ्यामुळे मनस्ताप सहन करीत आहेत़ शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला पोलीस लाइनमधील अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे़
पिंपरी पोलीस लाईनमध्ये तीन इमारती आहेत़ प्रत्येक इमारतीत ३२ कु टंूब राहतात़ ए इमारतीच्या मागे असलेले ड्रेनेज कित्येक महिन्यांपासून तुंबले असल्यामुळे परिसरात घाणीचे वातावरण तयार झाले आहे़ ड्रेनेज तुंबले असल्यामुळे त्यातील मोठ्या अळ्या पाईपच्या माध्यमातून बाथरूम आणि स्वयंपाक खोलीपर्यत येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे़ बी इमारतीच्या मागे काही कुटंूबाच्य बाथरूमचे पाईप तुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहेत़ तर मागील बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण पडल्याचे आढळून आले़ वाढलेल्या झुडपांच्या फ ांद्या, कचरा, प्लॉस्टिक कचरा यामुळे सायंकाळी आणि सकाळच्या वेळेत डास घरात येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली़ तसेच सी इमारतीच्यामागे संपुर्ण विभागाचे पाणी उघड्यावरून वाहत असल्यामुळे जागोजागी गटाराची अवस्था निर्माण झाली आहे़ (प्रतिनिधी)रुग्णांची संख्या वाढली
४तिन्ही इमारातीच्या समोर मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले मैदान बंद गाड्या आणि वाढलेल्या गवतामुळे व्यापल्यामुळे लहान मुलांना खेळण्याठी जागा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले़ पोलीस लाईनमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे़ पावसाळा संपत आला असतानाही या ठिकाणी एकदाही डास विरोधी औषधाची फ वारणी करण्यात आली नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली़ त्यामुळे गेल्या दोन महिन्यात लाईनमधील अनेक लोक आजारी पडल्याची माहिती मिळाली़
कुत्र्यांच्या उपद्रवाने हैराण
४कुत्र्यांचा उपद्रव, दारासमोरच वाढलेले गवत, घाणीचे वातावरण यामुळे इमारतीच्या परिसरात साथीचे रोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ड्युटीवर हजर राहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर जावे लागते़ मात्र त्यांच्या कुटंूबाच्या आरोग्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़ पावसाळा संपेपर्यंत स्वच्छता,फ वारणी, ड्रेनेजची कामे होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली़ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून स्वच्छतेबाबत सूचना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे़