निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर सव्वा कोटीच्या फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:23+5:302021-08-26T04:12:23+5:30

पुणे : मिळकत (प्रॉपर्टी) अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांच्या साह्याने गहाण खत करून ते तारण ठेवून त्याद्वारे सारस ...

The family of a retired police inspector has been charged with fraud of Rs | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर सव्वा कोटीच्या फसवणुकीचा गुन्हा

निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर सव्वा कोटीच्या फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

पुणे : मिळकत (प्रॉपर्टी) अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांच्या साह्याने गहाण खत करून ते तारण ठेवून त्याद्वारे सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीतून १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पुढे त्याचे हप्ते न भरता पतसंस्थेची फसवणूक केली, याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबासह ६ जणांवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन दत्तात्रय टेमघरे (वय ४०), अमोल दत्तात्रय टेमघरे (वय ३९), मनोज दत्तात्रय टेमघरे, मंगला दत्तात्रय टेमघरे (सर्व रा. इंद्रधनु सोसायटी, कोथरूड), भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुुंज), गणेश भागोजी कराळे (वय ५४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेकडून आधी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी न्यायालयाने कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. ही हद्द वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाची स्थगिती उठविल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी नितीन जोरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १३ एप्रिल २०१४ पासून सुरू झाली आहे. सचिन, अमोल, मनोज आणि मंगला टेमघरे यांनी सारस अर्बनकडे वारजे गट क्र. ७३ हिस्सा क्र. १ क्षेत्र ९५० चौरस मीटर ही स्वमालकीची जमीन गहाण खताद्वारे संस्थेला लिहून दिली. त्यावर संस्थेकडून १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज काढले. सुरुवातीला कर्जाचे हप्ते भरले. नंतर हप्ते भरणे बंद केल्याने फिर्यादी यांनी या मिळकतीवर कारवाई सुरू केली असता ही मिळकत अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. सखोल चौकशी केली असताना टेमघरे कुटुंबातील चारही आरोपींनी भगवान बराटे आणि गणेश कराळे या दोघा आरोपींशी संगनमत करून खोटा व बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

Web Title: The family of a retired police inspector has been charged with fraud of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.