दौंडच्या दुष्काळी भागात टंचाईच्या झळा!
By admin | Published: April 3, 2015 03:20 AM2015-04-03T03:20:28+5:302015-04-03T03:20:28+5:30
शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत
खोर : शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत
आहे. दौंडच्या दुष्काळी पश्चिम पट्टयातील ही स्थिती असून येथील ग्रामस्थ आताच पाणी पाणी करीत आहेत.
पाण्याची बचत करण्यासाठी या परिसरातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फळबागा जगविण्याची धडपड करीत आहेत. उन्हाळा चालू होण्याच्या आधीच शेतकरी कांदा, रब्बी पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सध्या कांद्याच्या कमी होत असलेल्या बाजारभावामुळे तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची होत असलेली कमतरता पाहता, दौंडच्या दुष्काळी भागामधील शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
दर वर्षी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तरावर रोजगार हमी योजना, ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचे तसेच सिमेंटचे बंधारे बांधून पावसाळ्याच्या कालावधीमधील वाहून जाणारे पाणी आडवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याची धडपड सुरू होत असते.
या भागातील पडवी, कुसेगाव, माळवाडी, देऊळगावगाडा, नारायणबेट, खोर, वासुंदे, रोटी या गावांचा मार्च-एप्रिल महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे.
या भागात कार्यान्वित असलेल्या सिंचन क्षेत्रामधील योजना मात्र शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत.
जनाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना अशा प्रकारच्या सिंचन योजनांकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला गेला, तर या भागामधील उन्हाळाच्या कालावधीमधील होत असलेली पाण्याची समस्या कमी हाईल, अशी अपेक्षा या भागामधील शेतकरीवर्गाची आहे.