मराठी साहित्यिक आणि चित्रपट समीक्षक मधू पोतदार यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:32 AM2020-10-09T11:32:03+5:302020-10-09T11:33:00+5:30
साहित्यातील काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे असे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले.
पुणे : मराठी साहित्यिक आणि चित्रपट समीक्षक मधु पोतदार( वय ७६) यांचे गुरुवारी रात्री ११.३० वाजता खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
भारतीय स्टेट बँकेत अधिकारी. मार्च 2001 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शालेय जीवनापासून लिखाणास सुरुवात सुरुवात केली होती. महाविद्यालयातील (बीएमसीसी, पुणे) ‘साहित्य-साधना’ या पत्राचे दोन वर्षे संपादक. साहित्यातील काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) इ.सर्व साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले.
प्रकाशित पुस्तके -
ओंजळफूल (काव्यसंग्रह), देवकीनंदन गोपाला, जयप्रकाश नारायण, गीतयात्री गदिमा, इतिहासातील वेचक-वेधक , छिन्नी हातोड्याचा घाव (संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन) , विनोदवृक्ष (विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन) , शिक्कामोर्तब, .वसंतवीणा (संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र) , कुबेर (मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र) , मानसीचा चित्रकार तो (संगीतकार वसंत प्रभू यांचे चरित्र) , वसंत लावण्य (संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र) , मराठी चित्रपट संगीतकार कोष , जनकवी पी.सावळाराम, गानगोष्टी.
पुरस्कार-
१. ‘छिन्नी हातोड्याचा घाव’ या चरित्रग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 1998-99 सालचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा ‘धनंजय कीर पुरस्कार’.
२.‘कुबेर’ या चरित्रग्रंथास माहिम सार्वजनिक वाचनालयाचा 2002 सालचा उत्कृष्ट वाड्मयाचा ‘कै.सौ.उषा दातार पुरस्कार’.
३. ‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रंथास पाथर्डी येथील ‘जनाई प्रतिष्ठान’चा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार.
४.‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रथांस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा 2010 सालचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्यसाहित्य पुरस्कार’.
५ . ‘जनकवी पी.सावळाराम’ या चरित्रग्रंथास साहित्य गौरव संस्था, पुणे यांचा 2016 चा ‘साहित्य गौरव पुरस्कार’.
६ . मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान, पुणे चा 2018 सालचा ‘मराठी भाषारत्न पुरस्कार‘.