पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरचे रिसेप्शनिस्टसोबत अश्लील कृत्य, टिळक रस्त्यावरील क्लिनिकमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:04 AM2022-05-25T11:04:07+5:302022-05-25T11:26:15+5:30
30 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने दिली होती तक्रार...
पुणे : पुण्यातील टिळक रस्त्यावर क्लिनिक असणाऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टरवरविनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरने क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील टिळक रस्त्यावरील एका क्लिनिकमध्ये हा सर्व प्रकार घडला. फिर्यादी तरुणी या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. रविवारी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही तरुणी क्लिनिकमध्ये साफसफाईची कामे करत होती. यावेळी आरोपी डॉक्टरने लक्ष नसताना पाठीमागून जाऊन तिला पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.