पुण्यातील या जिम वाढवत आहेत पुणेकरांचा फीटनेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:48 PM2017-11-16T16:48:16+5:302017-11-16T16:57:40+5:30
पुण्यातील काही फिटनेस क्लब आणि जिम सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांसहीत मोठीशी सवलतही देऊ करताहेत.
पुणे : दिवसभर काम करायचं म्हणजे तेवढी शक्ती आपल्या शरीरात हवी. त्यासाठी व्यायाम हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. नियमित घरच्या घरी व्यायाम करण्याचा विचार प्रत्येकजण करतो, मात्र ते कोणाकडून होत नाही. मग त्यासाठी जिमचा रस्ता धरला जातो. एकदम ब्रँडेड गोष्टींची सवय लागलेल्या तरुणाईला जिमही अशीच मोठी, प्रशस्त आणि आधुनिक सोय-सुविधांनी सज्ज हवी असते. कोणत्या जिममध्ये कसं ट्रेन केलं जातं? ट्रेनर कसे असतात? या सगळ्यांची माहिती तरुणाई शोधत असते. पुण्यातील अशाच काही प्रसिद्ध जिमविषयी आज आपण पाहुया.
इम्पल्स फिटनेस
पुण्यात महिलांसाठी जिम पाहत असाल तर इम्पल्स फिटनेस सेंटर हा उत्तम पर्याय आहे. महिलांसाठी इकडे खास वेगळी जागा करून देण्यात आली आहे. महिलांसाठी स्पेशल ट्रेनरही इकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची इकडे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे पुरुषांनाही इकडे योग्यप्रकारे ट्रेन केलं जातं. कोंढवा तालुक्यात असलेल्या या जिममध्ये सगळी साधनं इकडे उपलब्ध असल्याने अनेकजण इकडे येत असतात. जिम, कार्डिओ, योगा, झुंबा आणि स्टीम अशा विविध सुविधाही इकडे उपलब्ध आहेत.
डॉटफिट फिटनेस
तुम्ही जर स्वत:च्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी उत्तम ट्रेनिंगच्या शोधात असाल तर पुण्यातील बाणेर येथील बालेवाडी फाट्यावर असलेल्या डॉटफिट फिटनेसचा तुम्ही विचार करू शकता. तुमच्या शरीराला नक्की काय हवंय, सदृढ शरीरासाठी तुम्ही अजून काय करायला हवं याविषयावर योग्य ट्रेन इकडे केलं जातं. पॉवर झुम्बा, आहारविषयक माहिती, एरोबिक्स अशा जास्तीच्या सुविधा इकडे देण्यात येतात. अगदी वैयक्तिक मार्गदर्शनही इकडे केलं जातं, त्यामुळे तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इकडे मिळू शकतील.
युअर फिटनेस क्लब
तुम्ही कधी ‘क्राव्ह मॅगा टू बॅलिस्टीक केटलबेल’ विषयी कधी ऐकलं आहे का? सध्या हा जिममध्ये हा प्रकार फार ट्रेंडिंग आहे. भारतात अजूनही कित्येक जिममध्ये हा प्रकार उपलब्ध नाहीए. मात्र पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या युअर फिटनेस क्लबमध्ये या प्रकारची ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता. एकंदरीत आपल्या शरीराला ज्या ज्या व्यायामांची आवश्यकता असते, त्या साऱ्याची पुर्तता या एका प्ररकारात केली जाते. स्टिम आणि मालिश यासांरख्या सुविधाही या क्लबमध्ये आहेत. तसंच इकडे विविध मेंमबरशिपच्या संकल्पनाही आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये इकडे ट्रेनिंग घेऊ शकता.
गोल्ड जिम
बुधवार पेठेतील गोल्ड जिम संपूर्ण पुण्यात फार प्रसिद्ध आहे. गोल्ड जिमच्या अनेक शाखा देशभर पसरलेल्या आहेत. त्यामुळे या जिमला राष्ट्रीय दर्जा मिळालाय. तुमच्या फिटनेससाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या जिममध्ये उपलब्ध आहे. मुळात इडकच्या एक्सपर्ट ट्रेनर्समुळे हे जिम फार प्रसिद्ध आहे. तसंच सगळ्या सुविधा, साधनं या जिममध्ये असल्याने पुण्यातील तरुण याच जिमचा जास्त विचार करतात. बेस्ट फिटनेस चेन हा पुरस्कारही गोल्ड जिमला मिळालेला आहे.
रॉयल फिटनेस क्लब
तुम्हाला सायकलिंगची आवड असेल तर रॉयल फिटनेस क्लब तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. कारण इकडे स्पिनिंग आणि सायकलिंगच्या माध्यमातून उत्तम ट्रेन केलं जातं. नर्हेतील नेवळे ब्रिजजवळ असलेल्या विश्वा आकेर्डमध्ये हे जिम सेंटर आहे. किक बॉक्सिंग, अक्वा झुंबा, अक्वा स्पिनिंग अशा सुविधाही इकडे पुरवल्या जातात. तसेच विविध इक्विपमेंट्सही इकडे असल्याने चांगल्या दर्जाची ट्रेनिंग तुम्हाला इकडे मिळू शकते.