चेन्नईच्या चाहत्यांचा गट पुण्यात उत्साहात दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 04:00 PM2018-04-20T16:00:57+5:302018-04-20T16:28:50+5:30

कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना पुण्याला पोहोचता यावे, यासाठी चेन्नईच्या संघाने मोफत ट्रेनची व्यवस्था केली आहे.  

fan followers of Chennai are arrived at Pune | चेन्नईच्या चाहत्यांचा गट पुण्यात उत्साहात दाखल 

चेन्नईच्या चाहत्यांचा गट पुण्यात उत्साहात दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देआज चेन्नईची पुण्यात मॅच, पाठिंबा देण्यासाठी ट्रेन भरून चाहते हजर विसलपोडू एक्स्प्रेस फॅन क्लब स्पेशल ट्रेनने चाहते दाखल 

चेन्नई सुपर किंग या आयपीएल संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी भरलेली विसल पोडू एक्सप्रेस ' पुण्यात पोचली आहे. विसल पोडू एक्सप्रेस  नावाचा चाहत्यांचा गट चेन्नईच्या संघाचा नेहमीच पाठिंबा देत असतो. चेन्नईच्या संघाचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार असतात. आज पुण्यात चेन्नईची लढत राजस्थान रॉयल्स विरोधात  होत असून त्यासाठी पुणे स्टेशनवर शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास चेन्नईच्या चाहत्यांचे आगमन झाले.

       सुमारे ७०० चाहते या ट्रेनमधून तब्ब्ल २८ तासांचा प्रवास करून पुण्यात आले आहेत.  कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना  ने-आण करण्याची व्यवस्था संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे.

       शुक्रवारी पुणे स्टेशनवर  चेन्नई संघाचे पिवळ्या रंगांचे टी-शर्ट घातलेले चाहते मोठे जल्लोषात उतरले. त्यांचा उत्साह आणि मोठी संख्या बघून अनेक पुणेकरांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी सोडली नाही. आम्ही चेन्नईहून मॅच बघण्यासाठी आलेलो आहोत. आजच्या मॅचसाठी प्रचंड उत्सुक आहोत आणि धोनी आमचा आवडता खेळाडू असल्याची माहिती एका चाहत्याने दिली. सुरुवातीला सामने पुण्यात शिफ्ट झाल्याने आम्ही खूप निराश झालो होतो पण आता पुण्यापर्यंत आम्हाला पोचवण्याची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही चेन्नई संघ व्यवस्थापनाचे आम्ही आभारी आहोत अशीही प्रतिक्रिया चाहत्याने दिली. पुण्यातील सर्व सामने जिंकणार असल्याचा विश्वासही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.  

 

 

 

 

 

Web Title: fan followers of Chennai are arrived at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.