रसिकांनी अनुभवला नृत्यसंगीताचा अविस्मरणीय ‘एहसास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:47+5:302021-03-04T04:20:47+5:30
कृष्णासारखे प्रेम करणे अशक्य आहे. परंतु, आपल्याला त्याच्यासारखे प्रेम एकावर तरी करता यावे, हा भाव देखील मनात असणं, आपल्याला ...
कृष्णासारखे प्रेम करणे अशक्य आहे. परंतु, आपल्याला त्याच्यासारखे प्रेम एकावर तरी करता यावे, हा भाव देखील मनात असणं, आपल्याला कृष्णप्रेमी बनवतो... हाच अनुभव श्रोत्यांनी अनुभवला. संत कबीरांची ‘में वारी जाऊं’ ही रचना ईशा कुलकर्णी हिने कथकद्वारे साकारली तबल्यावर सादर केलेल्या ‘पद्मंत’ या नावाने लोकप्रिय असलेल्या संगीतमय नोटांची अद्वितीय रचना रसिकांना भावली.
‘बरबादियाँ’ या गाण्यानंतर ‘कोरवई’ या भरतनाट्यमद्वारे अनुजा कुलकर्णी यांनी घटम ह्या वाद्याच्या साहाय्याने रसिकांसमोर पेश केली. कौस्तुभ दिवेकर यांनी हाताळलेल्या घटमचे बोल मंत्रमुग्ध करणारे ठरले. काहोनवर कौस्तुभ दिवेकर आणि तबल्यावर यश सोमण यांची जुगलबंदी रंगली. व्हायोलिन आणि तबला ही जुगलबंदीही कमालीची रंगली.
या कार्यक्रमास पंडित रामदास पळसुले, मिलिंद पोटे, नेहा जोशी, वेदांती भागवत-महाडिक आणि संदीप सोमण उपस्थित होते. एहसासच्या शेवटच्या सादरीकरणाचे नाव ‘द लोकल ट्रेन’ असे ठेवण्यात आले. ह्यात तबल्यावर यश सोमण, काहोन आणि घटमवर कौस्तुभ दिवेकर, व्हायोलिनवर नूपुरा जोशी, गिटारवर अन्वय आहेर, पियानोवर शुभंकर भागवत, गायक म्हणून सौरभ करमरकर आणि सायली राजवाडे, कथक सादरीकरण ईशा कुलकर्णी, भरतनाट्यम सादरीकरण अनुजा कुलकर्णी असा एकत्रित कलाविष्कार पाहायला मिळाला. सेजल नातू यांनी निवेदन केले.