फराटे महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्तरावरील जीपॅट परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:20+5:302021-03-21T04:11:20+5:30
जीपॅट परीक्षेत महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. घावटे दीप्ती, मनोहर पाटोळे व शेख अलमिसबा यांनी ...
जीपॅट परीक्षेत महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. घावटे दीप्ती, मनोहर पाटोळे व शेख अलमिसबा यांनी अनुक्रमे १७०, १६५ व १५७ गुणांसह यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील फराटे, सचिव मृणालताई राजीव पाटील फराटे यांनी अभिनंदन केले.
ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असे परीक्षा अधिकारी प्रा. सातपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रा. खर्डे, प्रा. ढोबळे, प्रा. क्षीरसागर, प्रा. दरंदले, प्रा.जोंधळे आदींनी मार्गदर्शने केले.