क्रेन व्यावसायिकांनी केली भाडे दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:14+5:302021-07-28T04:10:14+5:30
शिवगंगा खोरे क्रेन संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. खेड शिवापूर, वेळू परिसरात मागील पाच सहा ...
शिवगंगा खोरे क्रेन संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. खेड शिवापूर, वेळू परिसरात मागील पाच सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे परिसरातील युवकांनी कंपन्यांसाठी लागणाऱ्या क्रेनचा व्यवसाय चालू केले होते, मात्र सततच्या डिझेल दरवाढीमुळे त्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शिवगंगा खोरे क्रेन संघटनेने आपल्या क्रेनच्या भाडेदरामध्ये वाढ केली आहे.
यामध्ये १२ टनसाठी ८०० रुपये प्रतितास, १५ टनसाठी १२०० रुपये प्रतितास, फरानासाठी ८००० रुपये एका शिफ्टसाठी असे दरपत्रक १ ऑगस्ट २०२१ पासून लागू असणार असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी साईकृपा क्रेन, माऊली क्रेन, आर.के. क्रेन, एस.के. क्रेन, योगायोग क्रेन, शिंदे क्रेन, वाघजाई क्रेन, वाडकर क्रेन, जय मल्हार क्रेन सर्व्हिसचे मालक तसेच शिवगंगा खोरे क्रेन संघटनेचे पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते.