जेजुरीत गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:22+5:302021-09-21T04:11:22+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची सुरक्षा लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक उत्सवांवर कडक निर्बंध लादल्याने याहीवर्षी अत्यंत साधेपणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची सुरक्षा लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक उत्सवांवर कडक निर्बंध लादल्याने याहीवर्षी अत्यंत साधेपणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन झाले होते. अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात यंदाचा गणेशोत्सव साजरा झाला. काल अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जनानिमित्त कोठेही जल्लोष पाहण्यास मिळाला नाही. ना ढोल-ताशे, ना मिरवणूक अशा परिस्थितीत केवळ गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत शहरातील ३५ सार्वजनिक गणेश मंडळांनी घराघरांतील गणपतीचे होळकर तलाव व मल्हार सागर जलाशयात गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक होडी व जीवरक्षक दल होळकर तलावावर ठेवण्यात आले होते. सर्व गणेश मंडळांनी येथेच गणेश विसर्जन उरकले. तर घराघरांतील गणरायाला होळकर तलाव आणि मल्हारसागर जलाशय येथे विसर्जित करण्यात आले.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.
फोटो
१) जेजुरीतील होळकर तलाव येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
२ ) जेजुरीच्या मल्हार सागर जलाशयात श्री गणेशाचे विसर्जन करताना
200921\img_7474.jpg
होळकर तलाव येथे विसर्जन करताना