बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:42 AM2019-01-21T11:42:13+5:302019-01-21T11:44:18+5:30
बी.जी. काेळसे पाटील यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांचे व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात आज हाेणार हाेते. या व्याख्यानाला फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी परवानगी दिली हाेती. परंतु शनिवारी अचानक डेक्कन एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्यामुळे आता विविध विद्यार्थी संघटना आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्मावी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त माजी न्यायमूर्ती बी.जे. काेळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमाेल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजन केले हाेते. आज बी.जे.काेळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयाेजित करण्यात आले हाेते. काेळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार हाेते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत.