वीज पडून शेतकरी दांपत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:32+5:302021-09-21T04:13:32+5:30

बारामती : कुरणेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील पणदरे खिंडीजवळील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दांपत्याचा विजेने बळी ...

Farmer couple killed in lightning strike | वीज पडून शेतकरी दांपत्याचा मृत्यू

वीज पडून शेतकरी दांपत्याचा मृत्यू

googlenewsNext

बारामती : कुरणेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथील पणदरे खिंडीजवळील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दांपत्याचा विजेने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत एक महिला जखमी आली आहे. पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला बसणे शेतकरी दांपत्याच्या जिवावर बेतले आहे.

बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय ५४) त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय ४४) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची शेतकरी दांपत्याची नावे आहेत. या घटनेत बाळासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी पद्ममिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.

घोरपडे यांची पणदरे खिंडीजवळ शेतजमीन आहे. सोमवारी बारामती शहर आणि तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. यावेळी शेतात काम करणारे हे तिघेजण एका झाडाच्या आडोशाला बसले होते. याचवेळी अचानक विजेचा मोठा कडकडाट होऊन वीज त्यांनी आसरा घेतलेल्या झाडावरच कोसळली. त्यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काही वेळातच संगीता यांचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फोटो आहे :

Web Title: Farmer couple killed in lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.