७० फूट खोेल चारीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पुण्यातील गणेगाव खालसातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:55 PM2018-01-10T13:55:50+5:302018-01-10T13:58:41+5:30
गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे चासकमानच्या कालव्यामध्ये अभिजित शंकरराव लोखंडे (वय ३०) या युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
वाघाळे : गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे चासकमानच्या कालव्यामध्ये अभिजित शंकरराव लोखंडे (वय ३०) या युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
शेतीकामानिमित्त चासकमानच्या चारीवर पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर बसवत असताना तोल जाऊन अभिजीत यांचा मृत्यू झाला. चारीत साधारणत: ७० फूट खोल पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते. सोमवार (दि. ८) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या पश्चत आई, वडिल, आजी, आजोबा, पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.