पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:01 PM2021-10-25T19:01:12+5:302021-10-25T19:09:46+5:30
राजगुरुनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर पुणे-नाशिक महामार्गावर पाषणकर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली
राजगुरूनगर:पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृध्दाचा जागीच मुत्यू झाला. पांडुरंग विठोबा पाषाणकर (वय ६०) साबुर्डी (ता. खेड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध शेतकऱ्यांचे नाव आहे. ही घटना दुपारी सव्वाचार वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत पाषाणकर बटाटा बियाणे आणण्यासाठी आले होते.
राजगुरुनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर पुणे-नाशिक महामार्गावर पाषणकर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. पाषणकर यांच्या पोटावरून चाक गेल्याने जागीच मुत्यू झाला. घटनास्थळी तत्काळ योगेश शिंदे व बाळा भांबुरे रुग्णवाहिका नेऊन पाषाणकर यांना खाजगी रुग्णालयात आणले. गंभीर जखमी असल्याने उपचारापूर्वी पाषाणकर यांचा मूत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हुतात्मा राजगुरु यांच्या स्मृती शिल्पासमोर हा अपघात झाला. या ठिकाणी नेहमी वर्दळ व वाहतुक पोलिस असतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडीधारक, फळे विक्रेते आहेत. मात्र अपघात दरम्यान रस्त्याच्या एका बाजूला दोन वाहने ऐकमेकांना घासल्यामुळे त्या वाहन चालकांची बाचाबाची सुरु होती. त्यामुळे त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होऊन वाहतुक बंद होती. हाकेच्या अंतरावर वाहतुक पोलिसांची केबीन आहे. मात्र वाहतुक पोलिस केबीनमध्ये आराम करीत होते. त्यामुळे अपघात करून वाहनचालक निघून गेला. अशी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.