सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:25 AM2018-07-10T01:25:10+5:302018-07-10T01:25:26+5:30

सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे.

Farmer News | सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

Next

सोमेश्वरनगर - सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे निर्यातीबाबत आपली आतंरराष्ट्रीय विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.
भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे जिल्हा शाखा सोमेश्वरनगर यांच्यावतीने ६९ व्या ज्ञान विज्ञान गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आघारकर कृषी अनुसंधान संस्थेचे संचालक अजित चव्हाण होते. पाहुण्यांनी उपस्थित श्रोत्यांशी ‘जागतिकीकरणानंतरची शेती’ या विषयावर संवाद साधला. यावेळी घनवट बोलत होते.
घनवट म्हणाले, की सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेती तोट्यात कशी राहील, अशीच धोरणे आहेत. शेतकरी कर्जबाजारी राहील, यासाठीच प्रयत्न केले आहेत. शेतकºयाला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतीचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. देशात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असताना इतर देशांतून अन्नधान्य आयात केले जाते. त्यामुळे शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.
शेतकºयाला व्यापार करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. गोवंशबंदी कायद्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. हा कायदा शेतकरीविरोधी आहे, म्हणून जागतिकीकरणाचे लाभ शेतकºयाला मिळालेच पाहिजेत. शेतकरी मतदान करताना जात बघतो, म्हणूनच त्याचे प्रश्न कायम आहेत. म्हणून शेतकºयांना प्रश्न सोडवायचे असतील तर जात, धर्म पाहू नये, असे घनवट म्हणाले.
धनाजी धुमाळ, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, मदन काकडे, अजहर नदाफ, समीक्षा मिलिंद, सविता पडवळ, प्राजक्ता पवार, अजय दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दत्तात्रय अलगूर व आदिवासी प्रवर्गातून इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. गोरख काळे यांचा आणि माजी सैनिकांसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राहुल खरात यांनी सूत्रसंचालन केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

Web Title: Farmer News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.