शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:18 AM2019-03-25T05:18:23+5:302019-03-25T05:18:33+5:30

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले.

 Farmer sells from the traders only in the weekend | शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

Next

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडेबाजार सुरू केले आहेत. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करीत आहेत, त्यामुळे शेतकरी आठवडेबाजाराचा ‘बाजार उठला’ असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शेतकºयांना स्वत:ची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी; तसेच व्यापाºयांना कमी दराने भाजीपाल्याची विक्री न करता शेतकºयांचे लहान-मोठे गट स्थापन करून शेतीमालाची विक्री करता यावी, या हेतूने शहरातील विविध भागांत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाच्या मान्यतेने आठवडेबाजार सुरू करण्यात आले. आठवडेबाजारात भाजीपाला विक्रीस बसणाºया विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडेबाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. काहीही न करता पैसे कमावता येत असल्याने बाजार चालवण्यास मिळावा, यावरून चढाओढ लागली आहे.
पणन विभागाच्या परवानगीशिवाय एकही शेतकरी आठवडेबाजार सुरू करता येत नाही. मात्र, पणन विभाग आणि पालिकेला विचारात न घेता थेट शेतकरी आठवडेबाजार थाटून त्यातून पैसा कमावला जात आहे. पालिकेने आपल्या हद्दीत सुरू झालेल्या आठवडेबाजारावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिकाºयांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
नियमानुसार शेतकरी आठवडेबाजाराचे आयोजन करण्याची परवानगी मिळालेल्या बाजार आयोजक कंपन्यांना काही नगरसेवकांनी हुसकावून लावले असल्याची माहिती समोर येत आहे. पणन विभागकडूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पणन विभागाच्या परवानगीने सुरू झालेल्या बाजारात विक्रीसाठी येणाºया प्रत्येक विक्रेत्याची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. व्यापाºयांना या बाजारात थारा मिळत नाही. मात्र, अनेक नगरसेवकांनी आठवडेबाजारांवर नियंत्रण प्रस्थापित करून शेतकरी आठवडेबाजाराच्या उद्देशाला हरताळ फासला आहे.

महापालिका आणि पणन विभाग यांच्यात अद्याप शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत सुमारे १२० आठवडेबाजार बेकायदेशीरपणे सुरू झाले. कोथरूड, बाणेर आणि पिंपळे सौदागर येथे आमच्या कोरडवाहू उथ्थान फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून आठवडेबाजार भरविला जात होता. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला हुसकावून लावले. स्वत: आठवडेबाजार ताब्यात घेऊन बाजारात शेतकºयांऐवजी व्यापारी बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील नाते तुटले. त्यामुळे पालिका व पणन विभागाने यात लक्ष देऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.
- सागर उरमुडे, संचालक, कोरडवाहू उथ्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अहमदनगर

Web Title:  Farmer sells from the traders only in the weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे