Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:42 PM2022-05-31T14:42:39+5:302022-05-31T15:05:42+5:30

खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ (आयएनए) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले

farmer son from Indapur is a sub lieutenant officer in the navy | Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

googlenewsNext

कुरवली : कुरवली (ता. इंदापूर) येथील अवधूत सतीश पांढरे यांनी नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ येथे १०२ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ नुकताच संपन्न झाला. यामध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करीत अवधूत पांढरे सब लेफ्टनंट अधिकारी बनले आहेत.

शेतकरी सतीश पांढरे व गृहिणी बायडा पांढरे यांचा मुलगा अवधूत पांढरे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी बनला आहे. खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ (आयएनए) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. एनडीएमध्ये अवधूत पांढरे यांनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. अवधूत यांचे पहिली ते चाैथीपर्यंतचे शिक्षण कुरवली गावातील चव्हाणवस्ती शाळेत झाले. पाचवी छत्रपती हायस्कूल परीटवाडी येथे व इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे पूर्ण केले. यादरम्यान इयत्ता बारावीमध्ये असताना एनडीएची निवड परीक्षा दिली होती.

शेतकरी कुटुंबातील मुलाने वेगळी वाट शोधत देशकार्यासाठी मार्ग निवडल्याने परिसरात अवधूतचे कौतुक होत आहे. शेतकरी सतीश पांढरे यांनी मुलांना उच्च शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले. आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास साथ दिली. अवधूतच्या यशाबद्दल सरपंच शोभा पांढरे, विजयकुमार पांढरे, सत्यवान चव्हाण, दिनेश पांढरे, दिलीप पांढरे, आंबादास कवळे, विठ्ठल फडतरे, बाळू पाटील, अरुण चव्हाण व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Read in English

Web Title: farmer son from Indapur is a sub lieutenant officer in the navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.