इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:13 PM2019-09-06T16:13:16+5:302019-09-06T16:44:01+5:30

भोडणी येथील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा झाला होता.

Farmer suicides due to loan at Bhodani in Indapur taluka | इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

Next

इंदापूर  : भोडणी येथील शेतकरी कांतीलाल गणपत खाडे (वय ५९ )  गुरुवारी  (दि.५ ) सकाळच्या दहा वाजण्याच्या वेळीस भोडणी येथील राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यातील  पत्र्याच्या अँगलला कर्ज फेडता येत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोडणी येथील शेतकरी कांतीलाल गणपत खाडे यांच्या कुंटुंबावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा झाला होता. हे कर्ज फिटत नसल्याने  आत्महत्या केली आहे असल्याची माहिती त्याचे भाऊ सुखदेव  खाडे यांनी दिली.

गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई खाडे या आपल्या घराच्या शेजारी बांधलेल्या गोठ्याकडे गेल्यानंतर पत्र्याच्या अँगलला कांतीलाल खाडे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खाडे यांना इंदापूर येथील सरकारी दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.खाडे यांच्याकडे तीन एकर जमीन असून त्यांच्यावर सुमारे अठरा ते एकोणवीस लाखांचे कर्ज असल्याचे ग्रामस्थांकडून समजते. याप्रकरणी इंदापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव करत आहेत.
आत्तापर्यंत या भागात चार शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकरी कर्जमुक्त करण्याच्या वल्गना केल्या मात्र शेतकरी कर्जमुक्त  झाला नसल्याने आत्महत्या करण्याचे पाऊल शेतकरी उचलून आपले जीवन संपवत आहे तरी देखील मायबाप सरकारला जाग येत नाही असा त्रागा अंत्यविधी करण्यासाठी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

Web Title: Farmer suicides due to loan at Bhodani in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.