कर्जबाजारीपणाला कंटाळून वडनेर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:08 AM2018-12-05T02:08:27+5:302018-12-05T02:08:33+5:30
वडनेर (ता. शिरूर) येथील राजेंद्र नाथा निचित (वय ४०) या शेतकºयाने शेतमालाला भाव मिळत नसल्याने, वाढत्या कर्जाला कंटाळून कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली.
टाकळी हाजी : वडनेर (ता. शिरूर) येथील राजेंद्र नाथा निचित (वय ४०) या शेतकºयाने शेतमालाला भाव मिळत नसल्याने, वाढत्या कर्जाला कंटाळून कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली.
याबाबत त्यांची पत्नी शोभा हिने सांगितले, की माझे पती राजेंद्र शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे, वाढत्या उत्पादन खर्चाच्या कर्जामुळे चिंतेत होते. त्यांनी शनिवारी शेतपिकासाठी आणलेले कीटकनाशक औषध पिले. ते समजतात राजेंद्र यांचे चुलतभाऊ मच्छिंद्र निचित त्यांना घेऊन, मंचर येथे शासकीय रुग्णालयात गेले, तेथून डॉक्टरांनी त्याला पिंपरी येथील वाय. सी. एम. रुग्णालयात पाठविले, तेथील डॉक्टरांनी प्रयत्न करूनही राजेंद्र याला वाचविण्यास अपयश आले, सोमवारी रात्री त्यांचे रुग्णालयात निधन झाले. राजेंद्र यांची दोन एकर जमीन असून, आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.