माळशिरस येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:02+5:302021-06-28T04:08:02+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने एकवीस जून ते एक जुलैपर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत असून, या कालावधीमध्ये प्रत्येक ...
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने एकवीस जून ते एक जुलैपर्यंत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत असून, या कालावधीमध्ये प्रत्येक गावात शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शिकवले जाते. या मोहिमेंतर्गत आज पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील लिंबाचीवाडी येथील शेतकऱ्यांना ऊस पिकाचे एकरी शंभर टन उत्पादन कसे घ्यावे, याबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान मंडल कृषी अधिकारी पिसर्वेचे कृषी पर्यवेक्षक अधिकारी दयानंद बनसोडे यांनी सांगितले. कृषी सहायक उदयंत वाघोले यांनी शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी विविध योजनांची ऑनलाईन मागणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक कृष्णा खोमणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ यादव, कृषिमित्र सोपान यादव, दीपक रामदास यादव, दत्तात्रय यादव, किसन यादव, बाबासाहेब यादव, दादासो यादव, माणिक यादव व अनेक तरुण शेतकरी उपस्थित होते.
कार्यकमाचे महेश यादव यांनी आभार मानले.
माळशिरस येथे कृषी संजीवनी योजने अंतर्गत मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी दयानंद बनसोडे.