राळे येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:47+5:302021-03-24T04:09:47+5:30
या कार्यक्रमात शेतकरी वर्गाला विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रामुख्याने कृषिपर्यवेक्षक आर. आर. ठाकूर यांनी ...
या कार्यक्रमात शेतकरी वर्गाला विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रामुख्याने कृषिपर्यवेक्षक आर. आर. ठाकूर यांनी शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता कशी वाढवावी माती परीक्षणासाठी मृदा नमुने कसे घ्यावे, याबाबत व ठिबक तुषार सिंचन योजना पिकावर औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी गोपीनाथ मुंढे-शेतकरी अपघात योजना, मागेल त्याला शेततळे योजना, पीकविमा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
गोविंद नाळे यांनी विकेल ते पिकेल, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उदयोग, फळबाग लागवड योजनाबाबत माहिती दिली.
यावेळी वराळे गावचे नवनिर्वाचित सरपंच दिनेश लांडगे, मंडळ कृषि अधिकारी गोविंद नाळे, सहायक कृषी अधिकारी व्ही. एल. खडतरे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी वर्गासाठी आहेत. त्या योजनांचा फायदा होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे दिनेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.
सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती व्ही. एल. खडतरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
--
फोटो २३ आसखेड कृषी प्रशिक्षण
फोटो ओळी : वराळे येथे शेतकरी प्रशिक्षणावेळी ग्रामस्थ व कृषी अधिकारी.