शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:55 AM2018-09-30T06:55:03+5:302018-09-30T06:55:58+5:30

पाऊस पेरणी नाहीच : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

Farmer in worries, due to water crisis due to rabi season! | शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

Next

पुणे : शेवटच्या टप्प्यात पाठ फिरविल्याने राज्याची पावसाची सरासरी ७८ टक्क्यांपर्यंत आली आहे. मराठवाड्यात २८ टक्केच पाणीसाठा असल्याने खरिपाबरोबरच रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूर विभागात ५१.४९ टक्के, अमरावती ५८.१५ व नाशिकमध्ये ६४.९९ टक्केच पाणीसाठा असल्याने रब्बी हंगाम संकटात येऊ शकेल.

नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, वर्धा, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्यता नाही. रब्बीचे क्षेत्र ५४ लाख ७५ हजार हेक्टर असून, त्यातील ३० लाख हेक्टर औरंगाबाद, लातूर व अमरावती विभागात येते. येथेच पाणी कमी असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आहे.

मराठवाड्यात मोठ्या प्रकल्पांत क्षमता ४ हजार ९८ दशलक्ष घनमीटर असली तरी १ हजार २२९ दशलक्ष घनमीटर साठा (२९.९९ टक्के) आहे. गेल्या वर्षी तो ७४.९२ टक्के होता. नाशिक प्रदेशात २ ८६७ दशलक्ष घनमीटर (७६.६८ टक्के) साठा सध्या आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८९.२८ टक्के होते. येथील निळवंडे-२ २३२ पैैकी १८८, मुळा ६०९ पैकी ४१७ आणि वाकी धरणात ७१ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या ६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
अमरावतीत उर्ध्व वर्धा क्षमतेच्या निम्मेच भरले असून, नेळगंगा व पेनटाकळीत १८.३३ व १९.३८ टक्के पाणीसाठा आहे. जळगावमधील इसापूरमध्ये ६७.०९ टक्के पाणीसाठा असल्याने काहीसा दिलासा आहे. पण विदर्भात नागपूरच्या गोसी खुर्दमध्ये ५०.८७ टक्के, बावनथडीत ३०.३५ टक्के व इटियाडोह येथे ५७.५९ टक्के पाणी शिल्लक आहे.

रब्बीचे सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये
विभाग ज्वारी गहू मका हरभरा अन्नधान्य
औरंगाबाद ३,९२,२६३ १,०५,६२० १४,१४९ १,२०,५८९ ६,३४,३३४
लातूर ४,९६,०६९ १,७७,९०० ५,५६० ३,२४,०४६ १०,०८,८६१
अमरावती १४,८०१ १,८०,८०० १२,२०४ ३,४२,१४३ ५,५०,७३८

आता शक्यता नाही
राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह अन्य भागांत आता मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रब्बीवर परिणाम होण्याची भीती आहे.

Web Title: Farmer in worries, due to water crisis due to rabi season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.