चासकमानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:20 PM2023-10-11T12:20:20+5:302023-10-11T12:20:50+5:30

निमोणे ( पुणे ) : चव्हाणवाडी - लंघेवाडी (ता .शिरूर)सह तालुक्याच्या पूर्व भागातील दहा गावांना चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनाच्या पाणी वाटपात ...

Farmers Aggressive for Chasakman Water; In the stance of peasant struggle | चासकमानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात

चासकमानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात

निमोणे (पुणे) : चव्हाणवाडी - लंघेवाडी (ता .शिरूर)सह तालुक्याच्या पूर्व भागातील दहा गावांना चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनाच्या पाणी वाटपात नेहमी दुजाभाव मिळत असल्याच्या कारणामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून चासकमान प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील; चव्हाणवाडी -लंघेवाडी , मोटेवाडी, निमोणे, गुनाट, निर्वी, आदी गावे पाणीवाटपातील चुकीच्या धोरणामुळे शेतीला पाण्यापासून वंचित आहेत. यातील काही भागांमध्ये अल्प, तर काही भागामध्ये आवर्तनाचे पाणी अजिबातच येत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून कालव्याच्या पोटचाऱ्या गेल्या आहेत. मात्र, त्याला पाणीच येत नसल्याने हा प्रकल्प काही शेतकऱ्यांसाठी 'मृगजळ' ठरला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही हा शेतकरी पाण्यापासून वंचितच राहिला आहे. त्यामुळे आवर्तनाच्या पाणी वाटपातील विषमता दूर करून रीतसर 'टेल टू हेड' असे पाणी वितरण व्हावे, यासाठी आता परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. निमोणे (ता. शिरूर) येथे नुकतीच या लाभक्षेत्रातील वंचित गावांच्या शेतकऱ्यांची राजकारणविरहित बैठक झाली. या बैठकीत परिसरातील ग्रामपंचायतचे ''टेल टू हेड'' असेच पाणी वितरण व्हावे यासाठी ठराव घेतले जाणार आहेत. ते संबंधित विभागाला सादर केल्यानंतरही पाणी वाटपामध्ये अन्याय झाल्यास व्यापक जनआंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था स्थापन करून त्याद्वारे पाणीपट्टी संबंधित खात्याकडे भरण्याचीही तयारी दर्शविली आहे.

या बैठकीसाठी लंघेवाडीचे सरपंच संतोष लंघे, नीलेश लोखंडे, निमोणे सरपंच संजय काळे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, संतोषराव काळे, निर्वीचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, नीलेश सोनवणे, मोटेवाडीचे संदीप एलभर, लालासो कोल्हे, सुरेश कोल्हे, गुनाट गावचे रमेश गाडे, पांडुरंग गव्हाणे, नम्रता धुमाळ यांसह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

"सर्व धरणांची पाणी वितरण व्यवस्था टेल टू हेड असताना चासकमान प्रकल्पाला वेगळा नियम कसा? या परिसरात उंच भाग असल्यामुळे कालव्याचे खोलीकरण जास्त प्रमाणात करावे लागलेले आहे. यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले असून त्यांचाही मोबदला तातडीने मिळणे आवश्यक आहे."

- संजय काळे सरपंच निमोणे.

Web Title: Farmers Aggressive for Chasakman Water; In the stance of peasant struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.