गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

By admin | Published: April 24, 2017 04:39 AM2017-04-24T04:39:53+5:302017-04-24T04:39:53+5:30

चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

Farmers are thriving due to leakage of infertile | गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

Next

चासकमान : चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असताना मात्र कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातील पाणी गळतीमुळे मध्येच जिरत आहे. नको असताना शेतात पाणी जिरत असल्याने येथील शेत नापीक होत आहे. यामुळे ही गळती कधी थांबनार असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.
धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे ठिकठिकाणी गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शेतात झिरपत असल्याने जमिनी नापीक होत आहेत.
धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने धरणांतर्गत असलेल्या डेहणे, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, तिफनवाडी परिसरातील पाणीपातळीत घट होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाव्या कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गळती होणाऱ्या पाण्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
या धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर तालुक्याला झाला. परंतु गेले ४० वर्षे उलटूनही चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तसेच अस्तरीकरण झालेले नाही. पश्चिम भागातील कमान, चास, आखरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान तसेच पूर्व भागातील भांबुरवाडी भागात गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही परिसरात ओढे, नाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाणी वाहताना दिसत आहे. कालव्याच्या गळतीमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जात असते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तरी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहत असते. यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farmers are thriving due to leakage of infertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.