विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने केला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:52+5:302021-08-27T04:14:52+5:30
माजी आमदार सोनवणे म्हणाले, शेतकरी संघटनेने जे आंदोलन केले आहे त्या आंदोलनास पांठिबा असून शेतकऱ्यांचे ज्या समस्या आहेत, त्या ...
माजी आमदार सोनवणे म्हणाले, शेतकरी संघटनेने जे आंदोलन केले आहे त्या आंदोलनास पांठिबा असून शेतकऱ्यांचे ज्या समस्या आहेत, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समोर सादर करू.
तालुकाध्यक्ष भुजबळ म्हणाले की, जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असून सध्या महावितरण कंपनीकडून आठवड्यातून चार दिवस रात्रीच्या बारा वाजता थ्री फेज लाईट देण्यात येत आहे. यामुळे बिबट्याचे हल्ल्याची शक्यता लक्षात घेत दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करावा. शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी यांनी या वेळी सांगितले की ज्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडलेले आहेत ते त्वरित जोडून द्यावे, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर आणि जुने पोल व तारा बदलून द्यावे व साळवाडी येेेेथे ज्या बापलेकाचा मुत्यू विद्युत तारांचा शाॅक लागून झाला. त्यांचे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी.
शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताद दौंडकर, दत्ता खोमणे, अजित वाघ, प्रमोद खांडगे, लक्ष्मण शिंदे, रामभाऊ लेंडे यांची भाषणे झाली. शेतकरी संघटनेच्या महावितरण कंपनीचे उपअभियंता एस. बी. सोनवणे, आर. डी. गांधी व मंडळाधिकारी राजेश ठुबे यांना निवेदने देण्यात आली.
२६ आळेफाटा
विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलन.
260821\20210826_115645.jpg
शेतकरी संघटनेने आळेफाटा चौकात केलेले रास्ता रोको आंदोलन.