पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Published: March 30, 2017 12:14 AM2017-03-30T00:14:02+5:302017-03-30T00:14:02+5:30

खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील

Farmers beat the water | पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

Next

देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी हाणामारी झाली. या वेळी वडगावदरेकरच्या ग्रामस्थांना मारहाण झाली. संतप्त वडगावदरेकरच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकले. एकंदरीतच तालुक्याच्या पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ््याच्या तोंडावर पेटला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नेमकी काय परिस्थिती राहील, याबाबत शेतकरी धास्तावला आहे.
वडगावदरेकर येथील बंधाऱ्यात पाणी पोहोचले नसल्याने येथील शेतकरी खोरवडीच्या बंधाऱ्यावर ढापे टाकून पाणी अडवले की काय, हे पाहण्यासाठी गेले होते. जर पाणी अडवले असेल तर ते पाणी वडगावदरेकरपर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रत्यक्षात मात्र ढापे टाकलेले होते. काही शेतकरी ढापे काढायला लागले. कौठा (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी ढापे काढण्यासाठी विरोध केला. वडगावदरेकर येथील शेतकऱ्यांना कौठा येथील शेतकऱ्यांनी मारहाण केली.
वडगावदरेकर येथील संतप्त शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी दौंड पाटबंधारे कार्यालयात गेले होते, मात्र पाटबंधारे कार्यालयात कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. परिणामी वडगावदरेकर येथील शेतकरी अधिक संतप्त झाले. शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तहसीलदार विवेक साळुंके यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले. साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे काढून घेतले.

पाटबंधारे कार्यालयाचे ढिसाळ नियोजन
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पोहोचू शकले नाही. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून ‘टेल टू हेड’ या पद्धतीने बंधारे भरायला हवे होते, परंतु तसे न करता पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्याने दौंड पश्चिमेकडील बंधारे भरल्याने पाणी दौंडच्या पूर्व भागापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही.
भामा-आसखेडचे पाणी भीमा नदी चालू होते तोपर्यंत पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करून पाणी दौंड तालुक्यातील खानवटे गावापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते, परंतु पाणी बंद झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माऊली कापसे, पोपट वाघमारे, राजू वाघमारे, शहाजी वाघमारे, मनोहर पहाणे, संभाजी वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmers beat the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.