मुख्यमंत्री सडक योजनेतर रस्त्याचे काम शेतकऱ्याने अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:00+5:302021-03-26T04:12:00+5:30
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून वेहळदरा वस्तीकडे जाणारा रस्ता आहे सुमारे तीन किमी (१७९ ग्रामीण मार्ग) रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ...
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून वेहळदरा वस्तीकडे जाणारा रस्ता आहे सुमारे तीन किमी (१७९ ग्रामीण मार्ग) रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मजबुतीकरणासाठी निधी आला आहे, त्यानुसार काम सुरू आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून वहिवाटी खाली आहे. सध्या रुंदीकरणासह रस्ता मजबुतीकरण सुरू आहे. मात्र गावातीलच एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातून रस्ता करू नये म्हणून हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. २५ वर्षांपूर्वी वेहळदरा येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविण्यात आला होता त्या वेळी संबंधित शेतकऱ्याने गावासाठी रस्ता करण्यास संमती दिली होती, आता पक्का रस्ता केला जात असताना संबंधित शेतकऱ्याने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.. या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन देत ग्रामस्थानी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांना देण्यात आले आहे..
--
२५राजगुरुनगर वेहळदाररस्ता
फोटो ओळ : वेहळदरा, ता. खेड येथील रस्ता करण्यात एका शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे रस्त्याचे काम बंद आहे.