भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी दिली संमती, चाकण औद्योगिक वसाहत टप्पा पाच : स्वखुशीने दिली हमीपत्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:06 AM2018-08-25T00:06:40+5:302018-08-25T00:08:00+5:30

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी आंबेठाण, वाकी खुर्द, रोहकल, बिरदवडी, बोरदरा, गोनवडी व चाकण येथील ७५३ एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या जमिनींचे मूल्यांकन दर

 Farmers' consent to land acquisition, Chakan Industrial Colony Phase Five: Authentic Declaration | भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी दिली संमती, चाकण औद्योगिक वसाहत टप्पा पाच : स्वखुशीने दिली हमीपत्रही

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी दिली संमती, चाकण औद्योगिक वसाहत टप्पा पाच : स्वखुशीने दिली हमीपत्रही

Next

आंबेठाण : गेले अनेक दिवस चाकण टप्पा क्रमांक ५ साठी भूसंपादनाच्या सुरू असलेल्या वादावर शेतकºयांनीच पडदा टाकला आहे. औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास तयार आहोत. आम्ही सर्व मूळचे शेतकरीच असून आमच्यात कोणीही एजंट अथवा दलाल नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. त्यासंदर्भात जवळपास बहुतांश शेतकºयांनी स्वखुशीने हमीपत्रही दिल्याचे शेतकºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी आंबेठाण, वाकी खुर्द, रोहकल, बिरदवडी, बोरदरा, गोनवडी व चाकण येथील ७५३ एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या जमिनींचे मूल्यांकन दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करताना संबंधित शेतकºयांच्या संमतीने करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हमीपत्र दिले आहे. पत्रकार परिषदेत अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला जमिनी द्यायच्या आहेत असे सांगितले. आमच्या भागातील विकास खुंटला आहे तो औद्योगिक वसाहत झाल्यावर वेगाने होऊन स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच जमिनीच्या बदल्यात आम्हाला चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही संमतीपत्र लिहून दिले आहे.

संघटनेच्या नावाखाली काही लोक शेतकºयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी या वेळी केला. काही लोक चाकण व पुण्यासारख्या शहरात राहून शेतकरी हिताच्या गप्पा मारत आहेत. याला आमचा ठाम विरोध असून आम्ही विकास प्रक्रियेत शासनाबरोबर असून एमआयडीसीला जमीन देण्यास ज्यांची संमती आहे, त्याबाबत पुढील कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उपस्थित शेतकºयांनी केली.
या वेळी दिनेश मोहिते, सचिन काळे, नंदकुमार गोरे, वसंत तनपुरे, शिवाजी गोरे, लक्ष्मण मोहिते, तबाजी मोहिते, भागाजी पवार, शंकर भुजबळ, बाळासाहेब काळडोके, चेतन गोरे, अर्जुन फडके, बाळासाहेब केदारी, छबन भुजबळ, भरत काळे, संतोष मोहिते, अमृतलाल परदेशी आदी शेतकरी उपस्थित होते.

औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक पाचमधील ज्या शेतकऱ्यांची संमतिपत्रे आमच्याकडे आली आहेत, त्यांच्या जमिनीचे भूसंपादन लवकरच होणार आहे. अगदी थोड्याच दिवसांत संबंधित शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्यात येणार आहे. आमच्याकडून कोणत्याही शेतकºयांना जमीन देण्यासाठी जबरदस्ती करण्यात येणार नाही.

- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

आंबेठाण, रोहकल व बिरदवडी या भागांतील जमिनीसाठी १,३७,५००० रुपये प्रतिहेक्टरी व ५५,०००० रुपये प्रतिएकर दर, तर चाकण, गोणवडी व वाकी खुर्द येथील जमिनीकरिता १,६२,५०,०० रुपये प्रतिहेक्टरी, ६५,००,००० रुपये प्रतिएकर असा दर निश्चित करण्यात आला आहे.

Web Title:  Farmers' consent to land acquisition, Chakan Industrial Colony Phase Five: Authentic Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.