भोर तालुक्यात शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:19+5:302021-02-21T04:16:19+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्घाटन भोर-मांढरदेवी मार्गावरील मौजे गोकवडी येथे करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भोर हिरामण शेवाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग असलेल्या संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र भोर तालुक्यातील गोकवडी येथील केदारेश्वर शेतकरी गटाने सुरू केले. या विक्री केंद्राचे उद्घाटन शरद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कृषी पर्यवेक्षक बी. ए. कांबळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहायक शशिकांत किरोळकर, प्रशांत सपकाळ, वैभव कदम, योगेश अंभोरे, अमृत मोहिते गोकवाडी गावाचे सरपंच भरत बांदल, सदस्य हेमंत राऊत, पोलीस पाटील सुधाकर बांदल, शिवाजी मरगजे, प्रवीण बांदल, हयाद शेख, संदीप बांदल, शशिकांत बांदल, रामभाऊ राऊत, लक्ष्मण बांदल, सिद्धेश्वर बांदल, नेरे गावचे शेतकरी प्रकाश बढे, संतोष म्हस्के गोकवडी येथील महिला शेतकरी शारदा बांदल, माया बांदल, वैशाली बांदल, सीता बांदल आदी उपस्थित होते.
चौकट
भोर-मांढरदेवी मार्गावर मांढरदेवी दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. येणाऱ्या भाविकांना भोर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ, नाचणी, हळद हा खात्रीशीर शेतीमाल माफक दरात या विक्री केंद्रावर उपलब्ध असल्याची माहिती शरद सावंत यांनी दिली.
- शेतकरी ते ग्राहक केंद्राचे उद्घाटन करताना मान्यवर व शेतकरी .