शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:27+5:302020-12-22T04:11:27+5:30
शेती मध्ये प्रामुख्याने जुन्नर तालुक्यातील पुर्व भागाती धना, मेथी, शेपू, मका, कोबी, फ्लॉवर, बीट, कांदा अश्या प्रकारची पीक शेतकरी ...
शेती मध्ये प्रामुख्याने जुन्नर तालुक्यातील पुर्व भागाती धना, मेथी, शेपू, मका, कोबी, फ्लॉवर, बीट, कांदा अश्या प्रकारची पीक शेतकरी आपल्या शेतात घेत आहेत. अशा परिस्थिती मध्ये कोरोना महामारीमुळे सध्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. पिंपरी कावळ येथील अर्जुन झिंजाड यांनी आपल्या शेतात दोन एकरचा कोबी केला तसेच अर्धा एकर फ्लॉवर केला. मात्र यांना बाजारभाव नसल्यामुळे शेतातमध्ये अक्षरशः जनावरे सोडायची पाळी या शेतकरी कुटुंबावर आलेली आहे.
झिंजाड यांनी शेतात अठरा हजार कोबीची रोप लावून वाढवली आहेत परंतु येथून जवळ पास ३० किलोमीटर अंतरावर मंचर मार्केट तसेच ओतूर मार्केट ४५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यासाठी येणारा खर्च हा पेलवणारा नाही. या शेतकऱ्यांना सध्या शेतीत काय माल करावा हे समजत या परिसरात विजेचा लपंडाव मोठया प्रमाणावर चालू असल्याने येथील शेतकऱ्यांना रात्रीचे पाणी भरावे लागत आहे. त्यातच या परिसरात बिबटयाचा वावर मोठया प्रमाणावर असल्याने येथील शेतकरी मंगेश झिंजाड यांची शेळी वाघाने हल्ला करून ठार केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसा पुर्ण वेळ लाईट द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
--