शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली

By admin | Published: May 22, 2016 12:41 AM2016-05-22T00:41:44+5:302016-05-22T00:41:44+5:30

जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचे एकमेव आर्थिक तारणहार असलेल्या कांदा, टॉमेटो या पिकांना या वर्षी चारी बाजूने ग्रहण लागल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

Farmers' economy collapses | शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली

Next

ओझर : जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचे एकमेव आर्थिक तारणहार असलेल्या कांदा, टॉमेटो या पिकांना या वर्षी चारी बाजूने ग्रहण लागल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या पिकांमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकरी वर्गाची केली आहे. शेतकरी वर्ग अधिक कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.
जुन्नर तालुक्यात शेतकरी वर्ग कांदा व टोमॅटो या पिकांकडे नगदी पीक म्हणून पाहत असतो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून अपुऱ्या पाण्यावर कसेबसे लाखो रुपये भांडवली खर्च करून कांद्याचे भरघोस उत्पादन घेतले. परंतु कांद्याच्या ढासळलेल्या दरामुळे शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले. सध्याच्या दरात कांद्याचा भांडवली खर्चदेखील वसूल होत नाही अशी परिस्थिती आहे. कांद्याला भविष्यात तरी दर वाढतील या अपेक्षेने बँका, सोसायट्या यांचे कर्ज काढून नवीन कांदा बराकी बांधून कांद्याची साठवण केली आहे.
रखरखत्या उन्हातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो पिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु दरम्यानच्या काळात सिजेंटा कंपनीने बियाणात फसवणूक केल्यामुळे हातीतोंडी आलेला घास हिरावून लाखो रुपयांच्या आर्थिक भुर्दंडाचा शेतकरी वर्ग शिकार झाला. त्यामध्ये अधिक भर पडली, ती या वर्षीच्या कडक उन्हाळ्याची व निसर्गाच्या लहरीपणामुळे. (वार्ताहर)

Web Title: Farmers' economy collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.