शेतकरी, शेतमजूर यांची आर्थिक कोंडी
By admin | Published: November 18, 2016 05:58 AM2016-11-18T05:58:32+5:302016-11-18T05:58:32+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून पैसे देणे व स्वीकारणे बंद केल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी परिसरातील शेतकरी, नोकरदार, शेतमजूर यांची अर्थिक कोंडी
निरवांगी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून पैसे देणे व स्वीकारणे बंद केल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी परिसरातील शेतकरी, नोकरदार, शेतमजूर यांची अर्थिक कोंडी झालेली आहे. जिल्हा बँक व शासनाने यावर त्वरित उपाययोजन करण्यात याव्या, अशी मागणी निमसाखर व परिसरातील बँकेचे खातेदार करीत आहेत.
जिल्हा बँकेत बँकखातेदारांना पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारत होती व देतही होती. परंतु, मंगळवार (दि.१५)पासून पाचशे व हजारांच्या नोटा खातेदारांकडून स्वीकारने व देणे बंद केल्या असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजुरांचे प्रचंड आर्थिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची बँकखाती ही जिल्हा बँकेत आहेत, यामध्ये शेतकऱ्यांची, सरकारी नोकदार, शेतमजूर यांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, काही नागरिकांची जिल्हा बँकेत व राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेत थोड्या प्रमाणात जुन्या नोट बदलून मिळत आहेत. परंतु, जिल्हा बँकेत काही खातेदार पैसेच मिळत नसल्याने या खातेदारांना राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे बदलण्यासाठी जाता येत नाही. यामुळे खातेदारांची आर्थिककोंडी निर्माण झालेली आहे. आमचा कष्टाचा पैसेही आम्हाला वेळेत मिळत नसल्याने आनेक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया खातेदारांतून होत आहे. यामुळे जिल्हा बँकेतील त्वरित पैसे मिळावेत, अशी मागणी होत आहे.