शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 01:43 AM2016-01-26T01:43:01+5:302016-01-26T01:43:01+5:30

वातावरणातील बदल, कोसळलेले बाजारभाव, दुग्धव्यवसायाची झालेली पीछेहाट यामुळे सध्या शेतकऱ्याच्या हातातील भांडवल बंद झाले आहे.

Farmers in financial crisis | शेतकरी आर्थिक संकटात

शेतकरी आर्थिक संकटात

Next

वडापुरी : वातावरणातील बदल, कोसळलेले बाजारभाव, दुग्धव्यवसायाची झालेली पीछेहाट यामुळे सध्या शेतकऱ्याच्या हातातील भांडवल बंद झाले आहे. रोजच्या खर्चालाही पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे. पुन्हा एकदा वाढलेल्या थंडीच्या कडाक्याने द्राक्ष आणि डाळींब बागांचे नुकसान होत आहे. पर्यावरणातील बदल हा शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. परंतु, गेली चार-पाच वर्षे पाऊसच पडला नसल्याने खरिपाचा हंगामही वाया गेला. तर रब्बीचा हंगामही वाया गेल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
काही दिवसांपासून अवकाळी पावसाची गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अत्यंत कष्टाने फळबागा जगविलेल्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सध्या द्राक्षाच्या बागा चांगल्या बहरात आहेत. मात्र दुपारी ऊन आणि रात्री थंडीच्या कडाक्याने बागांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली आहे. त्यात बाजारभावाची काळजी असल्याने उत्पादनखर्च तरी निघावा, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Farmers in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.