शेतकऱ्यांचा कांदा चाळीत साठवणुकीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:38+5:302021-05-01T04:10:38+5:30
सध्या कांद्याला ७० ते १२० रुपये प्रति दहाकिलो बाजारभाव मिळत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च केल्याने या बाजारभावात ...
सध्या कांद्याला ७० ते १२० रुपये प्रति दहाकिलो बाजारभाव मिळत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च केल्याने या बाजारभावात शेतकऱ्यांना भांडवली खर्च वसूल होत नाही. सध्या पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पावसापासून कांदा भिजू नये म्हणून शेतकरी तातडीने कांदा चाळीत कांद्याची साठवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.
--
कोरोनामुळे ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण
--
एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे कोरोना यामुळे कांदा बराखीत साठविण्यासाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बराखीत भरदुपारीही काम सुरु आहे. त्यामुळे वडगाव कांदळी येथील महिलांनी छत्री वापरून उन्हापासून स्वत:ची रक्षा करत सोशल डिस्टंसिंग राखत कांदा साठवणुकीचे काम सुरु ठेवले आहे.
--
कोट
सद्यस्थितीत कांद्याला ७० ते १२० रुपये प्रती दहाकिलो हा बाजारभाव आहे. हा बाजारभाव कमी असल्याने कांद्याची चाळीत साठवणूक केली आहे.ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बाजारभाव वाढल्यास कांद्याची विक्री करणार आहे जेणेकरून भांडवली खर्च व नफा मिळण्यास मदत होईल.
आदिनाथ भोर,
कांदा उत्पादक शेतकरी
--
फोटो क्रमांक :
फोटो ओळी : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे बराखीत भरण्यासाठी कांदा निवड करताना महिला. (छायाचित्र :पोपट बढे )