इंदापुरातील शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:03+5:302021-05-23T04:10:03+5:30

इंदापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. ...

Farmers in Indapur stand firmly behind Minister of State Bharne | इंदापुरातील शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

इंदापुरातील शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

Next

इंदापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. शासनाचा मोठा निधी दिला. मात्र विरोधकांच्या पोटात राजकीय गोळा आला आणि त्यांनी ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख हामा पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून शनिवार (दि.२२) रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. त्याचबरोबर 'कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या.

यावेळी माणिक महाराज मारकड, माजी पोलीस पाटील रामभाऊ पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील, उपसरपंच सुनील खामगळ, वसंत मारकड, हिरामण मारकड, अनिल पवार, नामदेव पाटील, अण्णा काळेल, संदीपान मारकड, अशोक राऊत, राजू पिसाळ, सोमनाथ पाटोळे, संदीप चितारे, महादेव मोरे, बापू खामगळ, भारत यमगर, अविनाश मारकड, जिगर मारकड, आरीफ पठाण, दीपक माने, अमर जाधव, हृषीकेश मारकड, सागर पाटोळे, रमेश पाटोळे, अमित पाटील, अंकुश चितारे, पांडुरंग यमगर, नामदेव खामगळ, अभिजित खामगळ, शिवाजी खामगळ व अनेक शेतकरी उपस्थित होते.

हामा पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाच टिएमसी पाणी दिल्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी विरोध करून सरकारवर दबाब टाकून निर्णय रद्द करण्याचा तगादा लावला. त्यामुळे आम्ही कौठळी गावातील शेतकरी सोलापूरच्या राजकीय लोकांचा जाहीर निषेध करतो.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठिशी तालुक्यातील शेतकरी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार. तसेच हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला.

२२ इंदापूर

इंदापूर तालुक्यातील कौठळी गावात आंदोलन करताना शेतकरी व कृती समितीचे पदाधिकारी.

Web Title: Farmers in Indapur stand firmly behind Minister of State Bharne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.